शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी, वाशिम – कारंजा (लाड) : कारंजा येथील के न्यूज कारंजा चॅनल्स पासून पत्रकारीता सुरु करून, नावारूपाला आलेले धडाडीचे पत्रकार साप्ताहिक कारंजा आस्मिताचे संस्थापक संपादक महेन्द्र गुप्ता यांच्या एकमेव कन्येने कु.मयुरी महेन्द्र गुप्ता हिने देखील वडिलांच्या मार्गदर्शनात महिला पत्रकार म्हणून पाऊल पुढे टाकले होते.साप्ताहिक कारंजा अस्मिता वृत्तपत्र आणि युट्युब चॅनल्सची ती सहसंपादिका म्हणून समाजसेवेत सेवारत होती. त्यापूर्वी तीने ज्युडो कराटे खेळांमध्ये ही प्राविण्य मिळवले होते.घरकामातही ती आपल्या आईला सर्वप्रकारे मदत करीत होती.अशी हरहुन्नरी मुलगी परंतु गेल्या दोन तिन महिन्यात तिला काविळ / न्युमोनिया आदी आजारानी ग्रासले.त्यामुळे तीला उपचाराकरीता नागपूर रुग्नालयात भरती करण्यात आले होते.परंतु तेथे अचानक तिला आलेल्या हृदयविकारामुळे तीचे सोमवार दि. 23 डिसेंबर 2024 रोजी रात्री आकस्मिक निधन झाले.तिचे निधनाची वार्ता समजताच कारंजा येथील पत्रकारीता जगतामध्ये शोककळा पसरली.कु.मयूरी महेन्द्र गुप्ता ही छकुली सर्व पत्रकारांची लाडकी होती.शिवाय ती तिच्या मैत्रीणी मध्येही सर्वच मैत्रिणीची आवडती होती. त्यामुळे सर्वाकडून तिच्या मृत्यु बद्दल हळहळ व्यक्त होत आहे. मंगळवारी दि.24 डिसेंबर 2024 रोजी दुपारी दारव्हा रोडवरील हिंदु स्मशान भूमीत तिचेवर तिचे लहान भावाकडून अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी विश्व हिंदु परिषदेचे अध्यक्ष मंगेश कडेल, बंटीभाऊ गाडगे,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल फुलारी, के न्युजचे संपादक तथा दै देशोन्नतीचे शहर प्रतिनिधी विजय काळे, गोपाल कडू,बहुजन पत्रकार संघाचे बंडू इंगोले,आरिफ पोपटे,प्रा. शेकूवाले,गजानन टोम्पे, पवनकुमार कदम,सौ.भाग्यश्री गणवीर, विनोद गणवीर इत्यादी खूप मोठा जनसमुदाय उपस्थित होता.येथे झालेल्या श्रद्धांजली कार्यक्रमात पत्रकारांतर्फे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे,युवा पत्रकार किरण क्षार,आशिष धोंगडे आदींनी आपल्या श्रध्दांजली मधून महेन्द्र गुप्ता यांच्या परिवारावर कोसळलेल्या दुःखाबद्दल खंत व्यक्त करतांना कु.मयुरी गुप्ता हिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.त्यानंतर उपस्थित आप्तेष्ट,जनसमुदाय,पत्रकारांतर्फे तिला सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

