
पुणे विशेष जिल्हा प्रतिनिधी प्रियंका मेश्राम – ग्लोबल व्हिजन फाउंडेशन पुणे संचलित इन्स्पायर अबॅकस ॲण्ड वेदिक मॅथ अकॅडमीच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत देशभरातून 837 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे आयोजन आणि परीक्षा:
स्पर्धेचे आयोजन चिंतामणी थेऊर रोड, थेऊर फाटा, पुणे येथील वृंदावन पॅलेस येथे करण्यात आले. सकाळच्या सत्रात आयोजित परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठमोठी गणिते अवघ्या 5 मिनिटांत सोडवून उपस्थितांना आश्चर्यचकित केले.
बक्षीस वितरण आणि प्रमुख पाहुणे:
बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आष्टी पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळभाऊ रकटाटे होते. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी:
रुद्र सोले, श्रावणी भोस्टे, विरा जाधव, पृथ्वीराज सोले व प्रणित देसाई या पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी 3 हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
चॅम्पियन ट्रॉफी विजेते:
निरंजन तांबे, अनन्या आळेकर, आर्यन नलावडे, आर्यन ढवळे, काश्वी राठोर, राज गर्जे, यश धाडगे, संस्कृती शितोळे, श्रेया खेडेकर, समीक्षा नाईक, रनवीर ऊगले, वीर ताटे, अक्षदा पाटील, सान्वी रणदीवे, सार्थक झगडे, यज्ञेश पवार, क्षीतीजा दारुणकर, आरोही कणसे, अर्जीश शेख, सार्थक राऊत, जुई पाथरीकर, सुरेश खताळ, श्रीवर्धन मारकड यांना चॅम्पियन ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
शिक्षकांचा सन्मान:
स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
स्टार टिचर अवॉर्ड: मंगल खेडेकर, मिरा शेळके, वंदना वांढेकर, स्नेहल सातपुते, मिनाक्षी शहाणे.
बेस्ट टीचर अवॉर्ड: सोनाली चव्हाण, सिमा कदम, रेश्मा देशमुख, शारदा गव्हाणे, अश्विनी खरमाटे, कविता आव्हाळे, प्रियदर्शिनी कापसे.
या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मा. बलभीम शेळके (कृषी अधिकारी, श्रीगोंदा)
मा. जयसिंग कारखिले (मु.अ. न्यु इंग्लिश स्कूल)
ह.भ.प. कैलास महाराज सातव, डॉ. अरविंद महाराज काळे (वाघोली)
मा. विठ्ठल (नाना) शितोळे (सरपंच, कोरेगाव मूळ)
मा. प्रविण आव्हाळे (सरपंच, आव्हाळवाडी)
मा. बापु बिचितकर (शिवसेना विभाग प्रमुख, ऊरुळी देवाची)
मा. सुरेश वाळेकर (संस्थापक-अध्यक्ष, कला गोविंद शिक्षण मंडळ, पुणे)
मा. श्रमीक गोजमगुंडे (संस्थापक-अध्यक्ष, सह्याद्री प्रतिष्ठान, हिंदुस्थान)
मा. अजीत कलागते (संस्थापक-अध्यक्ष, मारीगोल्ड इंटरनॅशनल स्कूल)
मा. राहुल जगदाळे (प्राचार्य, कै.तु.धों.पठारे कॉलेज)
मा. सदानंद चव्हाण (ग्राम महसूल अधिकारी, आष्टी)
मा. आशालता कटके (केंद्रप्रमुख, थेऊर)
मा. संभाजी भालेराव (केंद्रप्रमुख, केसनंद)
मा. दत्तात्रय खेडेकर (मुख्याध्यापक, दरेकरवाडी)
मा. जयश्री मोराडे (चिंतामणी हायस्कूल, थेऊर)
मा. सुवर्णा भाकरे (शिवसेना महिला अध्यक्षा)
कार्यक्रमाचे आयोजन आणि यश:
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अकॅडमीच्या अध्यक्षा अर्चना शेळके, सचिव दादासाहेब शेळके व संचालक मंडळाने विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले. प्रास्ताविक दादासाहेब शेळके यांनी केले तर आभार प्रदर्शन जय शेळके यांनी मानले.
स्पर्धेची विशेष वैशिष्ट्ये:
ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी गणित कौशल्य व स्मरणशक्ती वाढवण्यासाठी प्रेरणादायी ठरली. राष्ट्रीय स्तरावर घेतलेल्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना दिली. उपस्थित मान्यवरांनी याचे कौतुक केले.














