शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी, वाशिम – वाशिम : आजची तरुणाई म्हणजे आपल्या समाज, राष्ट्र, देशाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे तरुणाईने व्यसनाधिन न होता समाजातील गरजू, गोरगरीब, वयोवृद्ध,निराधार, दुर्धर आजारग्रस्त,दिव्यांग अनाथांच्या सेवेसाठी आयुष्य वेचले पाहीजे.असे आवाहन करतांना महाराष्ट्र शासन व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त संजय कडोळे यांनी सांगीतले की आजही आपल्या समाजात, गावात, देशात अनेक व्यक्ती उपासमारीमुळे भूकबळी होऊन मृत्युमुखी पडतात. अनेकांचा औषधोपचारा शिवाय मृत्यु होतो. हल्ली हृदयविकार,अर्धागवायू, कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तरुण आई किंवा वडिलांच्या अकाली मृत्युने त्यांचेवर अवलंबून असणारी त्यांची मुले आणि वयोवृद्ध आई वडिल प्रसंगी अनाथ बेघर होतआहे.त्यामुळे दारू,गांजा अशी विविध व्यसनं करून आसुरी आनंदात नववर्षाचे स्वागत करण्यापेक्षा गरीब गुदांना मदतीचा हाथ दिला पाहीजे.आता लवकरच आपण मावळत्या 2024 ह्या वर्षाला निरोप देवून 2025 ह्या नववर्षात पदार्पण करणार आहोत.खरे पहाता आपल्या भारतियांच्या नववर्षाचा शुभारंभ गुढीपाडवा या वर्षप्रतिपदेला सुरु होत असतो.परंतु सर्वमान्य जागतिक कालगणनेनुसार (इंग्रजी) वर्ष हे दि.1 जानेवारी रोजी सुरू होत असते.त्यामुळे दि.31 डिसेंबरच्या रात्री सरत्या वर्षाला निरोप देवून नववर्षाचे स्वागत फटाक्यांच्या आतिशबाजीने करण्याची पाश्च्यात्य प्रथा रुढ होऊ पहात आहे. ह्याचे वास्तव आपण जर पाहीले तर खरे म्हणजे ही प्रथा आम्हा भारतियांची नसून विदेशी पाश्चात्य संस्कृतीची आहे. व त्यातही कळस म्हणजे मावळत्या वर्षाच्या अखेरच्या रात्री शेकडो नव्हे अनगिनत मुक्या प्राण्यांचे (बकरे कोंबड्यांचे) बळी घेऊन मटण मासे खाऊन आणि दारू ढोसून जेव्हा सरत्या वर्षाला निरोप देण्याचे राक्षसी कृत्य केल्या जाते.तेव्हा निश्चितच मानवतावादी सज्जन माणसांचा जीव कासावीस होत असतो.त्यातच भर की काय म्हणून दुदैवाने आमचे शासनही दि.31 डिसेंबर रोजीचे रात्री उशिरापर्यंत सरकारी दारू दुकाने आणि बार सुरु ठेवायला परवानगी देते.त्यामुळे प्रत्येक भारतियांनी अशा घातकी कृत्याचा निषेध केला पाहीजे. व दारू ढोसून, मटण मासे खाऊन, फटाक्यांच्या आतिशबाजीत डि जे च्या तालावर धांगडधिंगा करीत पैशाची,आरोग्याची आणि समाजाची हानी करून पापाचे भागीदार होण्यापेक्षा त्याच पैशाने आपल्या गावातील,वस्तीतील, समाजातील तळागाळाच्या गरजू गोरगरीब, निराधार,दिव्यांग,अनाथ व्यक्तींना आवश्यक ते औषध सामुग्री,अन्न व खाद्यपदार्थ,कपडालत्ता देवून किंवा थंडीच्या दिवसाची जाणीव ठेवून गरजूंना स्वेटर,ब्लॅकेटचे वाटप करून गोरगरीबांचे आशिर्वाद घेऊन पुण्य मिळवीले पाहीजे.व अशा सामाजिक कार्याने मावळत्या वर्षाच्या निरोप देत नववर्षाचे स्वागत केले पाहीजे.असे आवाहन महाराष्ट्र शासन व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त दिव्यांग समाजसेवक संजय कडोळे यांनी समाजातील जबाबदार व्यक्तींना आणि भरकटणाऱ्या तरुणाईला केले आहे.

