प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – गडचिरोली : स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम हाती घेण्यात आला. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे पन्नासावे व शेवटचे सत्र नुकतेच पार पडले. या स्पर्धेतील सर्व सत्रात सहभागी स्पर्धकांचा आढावा घेण्यात आला. व स्पर्धेत नियमितपणे व जास्तीत जास्त सत्रात भाग घेणाऱ्या पाच कवींना उत्तेजनार्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने खुशाल म्हशाखेत्री (गडचिरोली), प्रेमिला अलोने (गडचिरोली), अजय राऊत (कवठी, जि. चंद्रपूर), वसंत चापले (गोगाव, जि. गडचिरोली), रेखा दिक्षित (कोल्हापूर) या
कवींची निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक नाटककार चुडाराम बल्हारपुरे, व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे व प्रा. अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे .
– चुडाराम बल्हारपुरे (नाटककार)

