prabodhini news logo
Home चंद्रपूर सावित्रीबाईचे योगदान समस्त महिला वर्गासाठी मौलिक व अजरामर – राजश्री शिंदे

सावित्रीबाईचे योगदान समस्त महिला वर्गासाठी मौलिक व अजरामर – राजश्री शिंदे

0
126

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर – महिलांवर्गासाठी साक्षरतेची कवाडे खुली करून युगस्त्री सावित्रीमाई जोतिबा फुले यांनी समस्त भारतीय महिला वर्गासाठी मौलिक व अजरामर योगदान दिलेले असून आजच्या त्यांच्या जयंतीनिमित्य आम्ही त्यांचे ऋणी असल्याचे सांगून महिलांनी शिक्षणाद्वारे केवळ चूल मुलं घर संसार सोबत नवनवीन क्षितिजे गाठलेली आहेत असे मत स्वयंसिद्धा महिला बचत गट सचिव राजश्री शिंदे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी जागतिक कन्या दिना निमित्याने मुला मुलींना चॉकलेट्स वितरण करण्यात आली तर भाजीविक्री करणाऱ्या व्यवसायिक वृंदा बेरशेट्टीवार तर लेडीज गारमेंटच्या सीमा दुपारे यांना भेटवस्तु व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सोबतच पक्षासाठी पाणी पिण्यासाठी प्लास्टिक कुंड्या उपलब्ध करून देण्यात आल्यात ह्या विधायक उपक्रमाला गुणवन्त कामगार नितीन राव यांनी आर्थिक सहयोग दिला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बचतगट व विकलांग सेवा संस्था पदाधिकारी यांनी सहकार्य दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here