prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – सावित्रीबाई फुले

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – सावित्रीबाई फुले

0
205

सावित्रीबाई म्हणजे
होत्या क्रांतीज्योती
त्यांच्या कार्यामुळेच
तेवल्या शिक्षण वाती…

स्त्री विकासासाठी
झटली आयुष्यात
हाल अपेष्टा करून
सहन अतोनात…

संकटे आली तरी
मागे नाही हटली
स्त्रियांची नवी पिढी
लाचारीतून वाचवली…

स्त्रियांवरील अत्याचार
सावित्रीबाईंनी रोखले
समाज सुधारायला
सदा जीवनी स्पंदाळले…

विनम्रता सहनशीलता
होती तिच्या ठायी
स्त्रीविकासाचा ध्यास
झाली सावित्रीबाई…

कवयित्री संध्या रायठक / धुतडे
(शिक्षिका), नांदेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here