छत्तीसगडमधील स्वतंत्र पत्रकार मुकेश चंद्राकर यांची हत्या
प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज – ०३ जानेवारी २०२५ छत्तीसगडच्या बस्तरमधून पत्रकारिता करणारे स्वतंत्र पत्रकार मुकेश चंद्राकर यांची हत्या झाली आहे. २ दिवसांपासून ते बेपत्ता होते. शुक्रवारी संध्याकाळी बिजापूर जिल्ह्यातील चट्टानपारा परिसरात एका सेप्टिक टाकीत त्यांचा मृतदेह सापडला. काही दिवसांपूर्वीच त्यांनी बस्तरमधील एका रस्त्याच्या बांधकामात झालेल्या बातमी केली होती. स्थानिक वृत्तांनुसार ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर सुरेश चंद्राकर नावाच्या एका स्थानिक ठेकेदाराशी मुकेश यांचा वाद झाला होता. याच ठेकेदाराच्या घराजवळच्या सेप्टिक टाकीत मुकेश यांचा मृतदेह सापडला आहे. मुकेश बस्तर जंक्शन नावाचं एक युट्युब चॅनल चालवत होते, तसंच एनडीटीव्ही आणि इतर माध्यमांसाठीदेखील ते काम करत असत. ते बस्तरमधून नियमितपणे भ्रष्टाचार, छत्तीसगडमधील आदिवासींचे प्रश्न आणि बस्तरमधील हिंसेबद्दल वार्तांकन करायचे.

