प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – क्रांती ज्योती सावित्रीमाई

0
75

ज्योतिरावांनी सावित्रीमाईस शिकवले
हे असे काय झाले नवलच ते घडले
भिडे वाड्यात मुलींसाठी शाळेचे दार उघडले
हे असे काय झाले नवलच ते घडले

सोडून घरी आपापल्या फुंकण्या
धरल्या मुलीनीं हातात लेखण्या
भिडे वाड्यात अक्षर पहिले वहिले गिरवले
हे असे काय झाले नवलच ते घडले

मुली हळूहळू गिरवू लागल्या मुळाक्षरें
त्या वाचू लागल्या ,लिहू लागल्या अक्षरे
भारतभर हे स्रीशिक्षणाचे वारे पसरले
हे असे काय झाले नवलच ते घडले

विरोध झाला सनातन्यांचा, हे खुळ कोणते नवे
मुलींना चुल मुलं सोडून शिक्षण का हवे
विरोधाला न जुमानता माईंनी शिक्षण चालू ठेवले
हे असे काय झाले नवलच ते घडले

ही कहाणी आहे ज्योती साऊंच्या संघर्षाची
प्रशासनाने ताब्यात घेऊन पाडलेल्या भिडेवाड्याची
एकेकाळी स्री शिक्षणाचे अजरामर कार्य वाड्यात घडले
हे असे काय झाले नवलच ते घडले

राष्ट्रीय स्मारक व्हावे म्हणून हवी चळवळ
नको नुसती वाडा पाडण्याची हळहळ
याच हेतूने पुण्यात पहिले फूले फेस्टिव्हल साजरे झाले
हे असे काय झाले नवलच ते घडले घडले

कवयित्री सौ.गुलाब अनिल वेर्णेकर
गोवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here