विवेक मिरालवार तालुका प्रतिनिधी अहेरी 8830554583 – तालुक्यातील वेलगूर येथील काही मजूर कामासाठी तेलंगणात गेले आहेत. यादरम्यान एका महिलेचा वाहन अपघातात मृत्यू झाला. तर 15 कामगार जखमी झाले आहेत. तेलंगणातील सिरसिल्ला गावाजवळ 1 जानेवारी रोजी हा अपघात झाला. कांताबाई सूर्यभान मराठे (45, रा. वेलगूर, ता. अहेरी) असे मृत महिला मजूराचे नाव आहे.
अहेरी तालुक्यातील वेलगूर येथील मजूर कापूस वेचण्यासाठी तेलंगणा राज्यातील करीमनगर येथे गेले होते. यावेळी नववर्षानिमित्त कामगार देवदर्शनासाठी जिपने वेमुलवाडा येथे जात होते. यादरम्यान सिरसिल्ला गावाजवळ या जिपला भीषण अपघात झाला. यात कांताबाई मराठे यांचा जागीच मृत्यू झाला. तर आनंदराव मराठे, गंगुबाई मराठे, कविता पालेजवार, रेखा गाताडे, लक्ष्मी मंडरे, वनिता सातारे, भिकू सातारे, उषा मराठे, सुनंदा राऊत, माया मराठे, ज्योती मराठे, विमल मराठे. निर्मला मंडरे,
माजी जि. प. अध्यक्षांची मदत
या काळात कांताबाई मराठा यांच्या नातेवाईकांना तेलंगणात जाण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. या संदर्भातील माहिती मिळताच माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी नातेवाईकांना वाहतूक खर्च व उपचारासाठी आर्थिक मदत केली. यावेळी नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मारपल्लीचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, राकेश सडमेक, प्रमोद गोडसेलवार, प्रकाश दुर्गे आदी उपस्थित होते.
गदेकर, सुरेखा गदेकर हे जखमी झाले. सर्व जखमींना करीमनगर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

