आचल कोरपे चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – स्थानिक शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना द्वारे आयोजित विशेष शिबीर चंद्रपूर जिल्ह्यातील मोहुर्ली या गावी ५ जानेवारी ते ११ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. ग्रामस्वछता, ग्रामोन्नती युवा जागृती व कायदे विषयक जनजागृती या संकल्पनेवर आधारित या शिबिराचे रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी डॉ.सरोज कुमार दता यांच्या मार्गदर्शन आणि देखरेखीखाली गेल्या २५ वर्षा पासून चंद्रपूर जिल्ह्यातील विविध गावी असे शिबीर विधी महाविद्यालय दर वर्षी यशस्वी रित्या आयोजित करून गावोगावी कायदे विषयक जनजागृती आणि आरोग्य विषयक मोफत मार्गदर्शन आणि औषधी वितरण कार्यक्रम गावातील लोकांना साठी राबविण्यात येणार आहे.
या सात दिवसीय शिबीरा दरम्यान चंद्रपूरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.अपर्णा देवाईकर, डॉ.समृध्दीआईचवार गावातील महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन व तपासणी करतील.प्रसिध्द चर्मरोग
तज्ञ स्नेहल पोटदुखे गावातील लोकांच्या त्वचे संदर्भातील समस्या जाणून त्यांना योग्य तपासणी करून उपचार करण्यात येणार आहे . डॉ.प्रसाद पोटदुखे यांच्या माफ्रत मोफत रक्तदाब तपासणी तसेच मधुमेह तपासणी करण्यात येणार आहे .सावंगी येथील आवार्य विनोबा भावे रुग्णालयातर्फे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार असल्याचे डॉ.दत्ता यांनी सांगितले आहे.
या शिबिराचा महत्वपूर्ण उपक्रम म्हणजे कायदेविषयक मोफत मार्गदर्शन या अंतर्गत डॉ.अभय बुटले, डॉ. पंकज काकडे, डॉ.मार्गवी डोंगरे, डॉ सुवर्णा मंगरुळकर, अँड. नंदिता नायर, अँड नंदकिशोर भंडारी, चंद्रपुरातील प्रसिद्ध अधिवक्ता ऐंड गीरीश मार्लीवार, अँड. प्रकाश बजाज, अँड. प्रसाद बेग या सर्वांनी विविध कायद्याचे मार्गदर्शन करणार असून गावाकरांच्या प्रश्नांची सोडवणूक केली जाणार आहे. रा. से.यो.विध्यार्थी स्वयंसेवकांनी या शिबिरात गावातील कायदे विषयक खटले या विषयी सर्वेक्षण केले जाणार असून व योग्य समस्या निवारण केली जातील , चंद्रपूरातील पतंजली योग सेवा समिती व्दारे विविध योगासने विषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे . शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांन व्दारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील व विविध क्रीडा स्पर्धा देखील घेण्यात येणार आहेत.
शिबीराचे आयोजन मोहुर्ली गाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत करण्यात आले आहे.मोहुर्ली गावाचे सरपंच सुनीता काटकर,उप-सरपंच
विकास गेडाम, बुध्दरत्न अवथरे, मुख्याध्यापक यांनी शिबिराच्या संपूर्ण कार्यक्रमात सक्रिय सहभाग देण्याचे आश्वासन दिले . शिबिराचा समारोपीय कार्यक्रम प्राचार्य डॉ.एजाज शेख तसेच संस्थेतील यांच्या पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे . प्राचार्य डॉ.एजाज शेख यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी हार्दिक शुभेच्छा प्रदान केल्या व आजच्या तरुण पिढीने या शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागाशी जुळण्याचे आवाहन देखील केले.प्रत्येक नागरिकांनी आपल्या देशाप्रती, समाजाप्रती आपल्या दायित्वाची जाणीव या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून जागृत ठेवण्याचे शिबिर आयोजना मागची भुमिका प्राचार्य डॉ.एजाज शेख यांनी व्यक्त केली आहे.शिबिराला विधी महाविद्यालय येथील १०० विद्यार्थी सहभाग घेणार आहेत. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी समस्त पदाधिकारी यांनी हार्दिक शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.महाविध्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी हे शिबिरात सहभागी होणार आहे.

