जागतिक पारायण दिनाच्या माऊली गजानन महाराजांच्या पारायणाला जास्तित जास्त सद्‌भक्तांनी सहभागी व्हावे

0
149

शारदा भुयार प्रबोधिनी न्युज जिल्हा प्रतिनिधी वाशिम – कारंजा (लाड) : आज अखिल विश्वात,श्रीक्षेत्र शेगाव येथील श्री. संत गजानन महाराजांचे करोडो-अब्जो भाविक अनुयायी असून,श्रीक्षेत्र शेगावच्या श्री.संत गजानन महाराजांनाच नव्हे तर आपल्या अंतर्मनाला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या घरात सुख शांती प्रसन्नता व आनंद राहावा यासाठी श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र ग्रंथाच्या पारायणाची परंपरा चालत आलेली आहे.कारंजा (लाड) येथील नगर पालिकेच्या इमारती जवळ,शहर पोलीस स्टेशनच्या आवारात श्री.संत गजानन महाराजांचे सर्वात पुरातन आणि कारंजा शहरातील पहिलेच श्री संत गजानन महाराज मंदिर आहे. दररोज येथे नित्यनियमाने, श्रीक्षेत्र शेगाव प्रमाणे पूजाविधी पार पाडले जात असतात. शिवाय दर गुरुवारी सायंकाळी महाआरतीनंतर भाविकांच्या ऐच्छिक देणगी मधून महाप्रसादाचा कार्यक्रम श्री संत गजानन महाराज सेवाधारी मंडळाकडून पार पडत असतो. त्यामुळे दर गुरुवारी कारंजा शहराच्या कानाकोपर्‍यातून भाविक मंडळी दर्शनाला येत असतात.लाखो भाविकांची येथील रेलचेल पहाता दर गुरुवारी मंदिरातील आनंदसोहळ्याला यात्रेचे स्वरूप येत असते.अशा ह्या जागृत श्री. गजानन महाराज मंदिरामध्ये येत्या रविवारी दि.12 जानेवारी 2025 रोजी सकाळी 09:00 वाजेपासून संपूर्ण दिवसभर एकवीस अध्यायी श्री.संत गजानन महाराज ग्रंथाचे विराट असे सामुहिक पारायण होत आहे.तरी जास्तित जास्त भाविकांनी पारायणामध्ये सहभागी होण्याचे आवाहन श्री. संत गजानन महाराज मंदिर सेवाधारी मंडळ कारंजा कडून करण्यात येत आहे.त्यासाठी कारंजा शहर पोलीस स्टेशन आवारातील श्री.संत गजानन महाराज मंदिरामध्ये पारायणाला बसणाऱ्या माऊली भक्तांची नोंदणी सुरू आहे.असे वृत्त प्रसिद्धीसाठी मिळाल्याचे संजय कडोळे यांनी कळवीले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here