शारदा भुयार प्रबोधिनी न्युज जिल्हा प्रतिनिधी वाशिम – कारंजा : कारंजा येथे समस्त तेली समाज महिला मंडळांनी दिनांक ०४ जानेवारी २०२४ रोजी कारंजा येथे जीरापुरे यांच्या निवासस्थानी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली.या महिला मंडळांनी गेल्या १८ वर्षापासून अविरत बीसी (सामुहिक अल्पबचत) योजना चालवलेली आहे. क्रांतिज्योतीसावित्रीबाई फुले जयंती व बिसीला १८ वर्षात पूर्ण झाले हा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी उत्साह म्हणून स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कारंजा मानोरा मतदार संघाचे आमदार श्रीमती सईताई डहाके यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला तेली समाजाच्या बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

