जागतिक पारायण दिना निमित्त माऊली संत गजानन भक्तांकडून सामुहिक पारायण सोहळा संपन्न.

0
103

शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी वाशिम – कारंजा (लाड) : अखिल विश्वात,श्रीक्षेत्र शेगाव येथील श्री. संत गजानन महाराजांचे करोडो-अब्जो भाविक अनुयायी असून,श्रीक्षेत्र शेगावच्या श्री.संत गजानन महाराजांनाच नव्हे तर आपल्या अंतर्मनाला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या घरात सुख शांती प्रसन्नता व आनंद राहावा. यासाठी श्री.संत गजानन महाराजांच्या एकविस अध्यायी पवित्र ग्रंथाच्या पारायणाची परंपरा चालत आलेली आहे.त्यानुसार रविवार दि. 12 जानेवारी 2025 रोजी,कारंजा (लाड) येथील श्री संत गजानन महाराजांच्या,सेवाधारी मंडळी कडून कारंजा येथील संत गजानन महाराजांचे कारंजा येथील भेटी दरम्यान त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीवरील (कारंजा शहर पोलीस स्टेशनच्या आवारातील, आदिशक्ती श्री. कामाक्षा देवी संस्थान समोरील) श्री.संत गजानन महाराज मंदिरामध्ये श्री संत गजानन महाराजांचे एकवीस अध्यायी ग्रंथाचा सामुहिक पारायणाचा विराट असा कार्यक्रम सोहळा आनंदोत्साहात पार पडला.या वेळी जवळ जवळ अकराशे महिला पुरुष भाविकांनी सामुहिक पारायणात सहभाग घेतलेला असून, पारायणानंतर महाआरती होऊन भाविकांकरीता माऊली भक्तांकडून महाप्रसादाचा व्यवस्था करण्यात आलेली होती. हजारो भाविकांनी शिस्ती मध्ये महाप्रसादाचा लाभ घेतला. पारायण करणाऱ्या भाविकांकरीता जागेवरच अल्पोपहार,चहापाण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. व त्यांच्या व्यवस्थेकरीता श्री संत गजानन महाराजांचे शेकडो सेवाधारी निःस्वार्थ सेवा देत होते. कारंजा येथील श्री.संत गजानन महाराजांचे सेवाधारी भक्त बिपीनजी वाणी, श्री.संत गजानन महाराज संस्थानचे सेवाधारी सुरेशरावजी ठाकरे गुरुजी, गजाननराव कडू पाटील व सर्वच सेवाधारी मंडळीच्या संकल्पनेतून श्री.संत गजानन महाराजांच्या जागतिक पारायण दिना निमित्ताने हा धार्मिक व आध्यात्मिकतेचा ज्ञानयज्ञ हर्षील्हासात पार पडल्याचे वृत्त श्री.संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे सेवाधारी असलेले ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here