वाघाच्या हल्ल्यात जखमी शेतकऱ्याला आमदार रामदास मसराम यांची मदत

0
117

आरमोरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आरमोरी मतदारसंघाचे आमदार रामदास मसराम यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेले शेतकरी गणपत नखाते , जुनी वडसा यांना तत्काळ दवाखान्यात भरती करून त्यांच्यावर योग्य उपचार होण्यासाठी डॉक्टरांना निर्देश दिले.

जखमी शेतकऱ्याच्या आरोग्याची काळजी घेत, त्यांनी तातडीने सर्वतोपरी मदत उपलब्ध करून दिली. यासोबतच त्यांनी वनविभाग कार्यालयाला योग्य तो पंचनामा करून गणपत नखाते यांना नुकसान भरपाई देण्याच्या सूचनाही दिल्या.

शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पुढील काळात योग्य ती उपाययोजना करण्यावरही त्यांनी भर दिला. या तात्काळ कृतीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आमदार रामदास मसराम यांच्याबद्दल विश्वास व आदर वाढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here