सिडीसीसी विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांचे विभागीय सहनिबंधकांना निवेदन.

0
82

मागण्या मान्य न झाल्यास आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या सदस्यांचे गुरुवार दिनांक 16 जानेवारीपासून आमरण उपोषण.

भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर – सिडीसीसी बैंक नोकर भरतीत सुरु असलेला भ्रष्टाचार व मागासवर्गीय एससी, एसटी व ओबीसी प्रवर्गाचे संपुष्टात आणलेले आरक्षण या विरोधात मागील 2 जानेवारीपासून सर्व पक्षीय व विविध मागासवर्गीय संघटनाचे पदाधिकारी यांनी आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून साखळी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे, आज आंदोलनाचा 12 वा दिवस असून शासन प्रशासन यांचे याकडे दुर्लक्ष होतं असल्याने आंदोलनकर्त्यांनी आज दिनांक 14 जानेवारी 2025 ला विभागीय सहनिबंधक वानखेडे यांची नागपूर येथे भेट घेऊन त्यांना निर्वानीचा इशारा दिला की जर उद्यापर्यंत भ्रष्ट मार्गाने होतं असलेली नोकर भरती रद्द केली नाही तर गुरुवार दिनांक 16 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरु करण्यात येईल, दरम्यान वानखेडे यांनी नोकर भरती प्रक्रियेची चौकशी करून निर्णय घेऊ असे आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिले आहे. यावेळी आरक्षण बचाव संघर्ष समितीचे समन्वयक तथा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, भाजपच्या ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोज पोतराजे, राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्य सचिव संजय कन्नावार, स्वराज्य शेतकरी संघटनेचे संस्थापक सूर्या अडबाले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक नोकर भरती परीक्षेत पहिल्याच दिवशी मोठा घोळ झाल्यानंतर ही परीक्षा सेटिंग करून घेण्यात येत आहे हे समजल्यावर 31 हजार तरुण बेरोजगार यांनी परीक्षा फार्म भरले असतांना अवघ्या 12 ते 13 हजार परीक्षार्थिनी परीक्षा दिली होती, दरम्यान प्रत्येक उमेदवारांकडून 30 ते 40 लाख घेऊन भरती प्रक्रिया राबवीत असल्याचे स्वतः आमदार किशोर जोरगेवार यांनी हिवाळी अधिवेशनातं विधिमंडळ सभागृहात जाहीर वक्तव्य केल्यानंतर शासनाकडून या भरती प्रक्रियेवर स्थगिती येईल असे वाटले असताना आता ज्या आमदारांनी सिडीसीसी बैंक नोकर भरती विरोधात आवाज उचलला तेच गप्प झाल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त होतं आहे. पण दररोज परीक्षार्थी यांच्या तक्रारी वाढत असून ज्यांनी 90 पैकी 90 प्रश्न सोडवले त्यांना त्यांच्या पूर्ण प्रश्नाची उत्तरे तपासली गेली नाही, त्यामुळे परीक्षेत झालेली गडबडी आणि पैसे घेऊन निवडण्यात येत असलेले जवळचे उमेदवार यामुळे ही नोकर भरती बोगस असल्याने ही भरती प्रक्रिया रद्द करण्याची परीक्षार्थी यांची मागणी आहे. दरम्यान आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या आंदोपणाला विविध समाज संघटनेचा पाठिंबा मिळतं असल्याने हे आंदोलन दिवसेंदिवस पुन्हा तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहे.

विभागीय सहनिबंधक वानखेडे यांना सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीची परीक्षा घेणाऱ्या आयटीआय कंपनीची काय भूमिका होती, कशी परीक्षा हायजाक करण्यात आली, या कंपनीच्या बैंक संचालक सोबत कुठे कधी बैठका झाल्या आणि ज्यांनी पैसे दिले त्यांना पास करण्यासाठी कंपनीने बैंक संचालकाकडून किती पैसे घेतले याबद्दल भाजप ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोज पोतराजे यांनी विश्लेषण करून माहिती दिली आणि कंपनीच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी सुद्धा केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here