धानाचे चुकारे तात्काळ देण्यात यावे – आमदार रामदास मसराम यांचे निवेदन

0
67

आरमोरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क –
शेतकऱ्यांचे धान खरेदी झाले असूनही अद्याप त्यांना चुकारे मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रोजच्या जीवनात अडचणी निर्माण होत आहेत. याची दखल घेत आमदार रामदास मसराम यांनी उपविभागीय अधिकारी यांची भेट घेतली आणि धानाचे चुकारे तात्काळ देण्यात यावेत अशी मागणी केली.

आमदार रामदास मसराम यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पीक घेतले आहे, परंतु अद्याप त्यांच्या मेहनतीचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणी वाढत असून त्यावर प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनीही आपल्या समस्या मांडल्या. चुकारे मिळण्यास होणारा उशीर यामुळे त्यांचे शैक्षणिक, आरोग्य आणि इतर गरजा पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत.

आमदार मसराम यांनी प्रशासनाला सांगितले की, शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे लवकरात लवकर मिळाले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. उपविभागीय अधिकारी यांनी यावर सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले.

त्या वेळी उपस्थित,माजी सभापती परसराम टिकले,माजी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले,माजी उपसभापती नितीन राऊत,दिनेश कुर्जेकर,प्रशांत कीलनाके,राजू गायकवाड,वैभव कुर्जेकर , सुनील झुरे, प्रणय नाकाडे, उमा भारती,कैलास गायकवाड,विवेक तुपटे , ज्ञानदेव पिलारे,प्रफुल गणवीर, रफिक शेख, सागर वाढई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here