तालुका प्रतिनिधी अहेरी विवेक बा मिरालवर 8830554583 – अहेरी तालुक्यातील मौजा – पेरमिली येथील धान खरेदी केंद्राची सुरुवात हे सभासद – बाळकृष्णा पडालवार आणि सत्यनारायण चंदनखेडे यांच्या शुभ हस्ते पुजा करुन, धान खरेदीला उद्घाटन करण्यात आले आहे.
यावेळी उपस्थित नागरिकांनी धान खरेदी केंद्राचे सचिवांना म्हणले की, धान खरेदी केंद्र लवकर सुरू ना झाल्यामुळे आपला पेरमिली क्षेत्रातील शेतकरी हे आपला धान खाजगी व्यापाऱ्यांना कमी किमतीत धान विकत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे असे म्हणाले. त्यावेळी सचिव यांनी उपास्थित नागरीकांना सांगीतले की आपला पेरमिलीचा नविन धान खरेदी करायला जागा पाहिजे होता. कारण जुना धानाची आजुन उचल झालेली नाही म्हणून यावर्षी धान खरेदी सुरू करायला उशील झालेला आहे असे सचिवांनी म्हणाले.
त्यानंतर उपास्थित नागरीकांनी यावर्षीचा धान खरेदी करण्यासाठी म्हणुन एका व्यक्तीचा जमीन उपलब्ध करून दिले. म्हणुन आता पेरमिली क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपले धान व्यापाऱ्यांना कमी किमतीत ना विकता सरकारी धान खरेदी केंद्रात विकावे असे चर्चा झाला.
यावेली उपास्थित माजी जि.प. सदस्य – रामरेड्डी बंडामवार, रा.यु.काँ. चे जिल्हा सचिव – बालाजी गावडे, संदीप गावडे, अमरनाथ गावडे, केंद्राचे सचिव – रोशन येगलोपवार, लक्ष्मण कुळमेथे, मोहन वेलादी, कपिलदेव आत्राम, संतोष मेश्राम, भिमराव सडमेक, प्रदीप आत्राम, लक्ष्मण मडावी, बंडु सडमेक, विजय चांदेकर, हनमंतु औतकार आणी पेरमिली क्षेत्रातील शेतकरी उपास्थित होते.

