– विनोद कोल्हे मराठवाडा अध्यक्ष भीम आर्मी
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – लातूर शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने सामान्य जनतेची दिशाभूल होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. स्लम भागांमध्ये भाजपचे काही सदस्य शासकीय योजनेच्या नावाखाली लोकांना फसवत असल्याचा आरोप झाला आहे. “लाडकी बहिणी” योजनेप्रमाणेच एक नवीन योजना 18 वर्षे वय पूर्ण झालेल्या स्त्री-पुरुषांसाठी आहे, अशी खोटी माहिती देत, नाव व मोबाईल नंबर गोळा करून लोकांची फसवणूक केली जात आहे.
फॉर्म भरल्यानंतर लोकांना भाजपचे सदस्य बनवल्याचा मेसेज येत असल्याने अनेक जण संभ्रमित झाले आहेत. ही बाब भीम आर्मी मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी भाजप सदस्यांना थेट फोन करून विचारणा केली आणि शासकीय योजनेच्या नावाखाली दिशाभूल करून फसवणूक करण्याच्या प्रकारावर रोख लावण्यासाठी कडक कारवाईचा इशारा दिला.
विनोद कोल्हे यांनी स्पष्टपणे सांगितले की, तुम्ही लोकांना भाजप सदस्यत्वासाठी नोंदणी करायला सांगू शकता, परंतु खोटी माहिती देऊन लोकांची फसवणूक करू नका. त्यांनी या प्रकरणावरून भाजप सदस्यांना समज दिली असून, अशा प्रकारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

