शर्मिष वासनिक जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली – स्थानिक कोहळी समाज संघटना शाखा गडचिरोली तर्फे शहर व परिसरातील कोहळी समाज बांधवांचा व महिलांचा स्नेह मिलन मेळावा 19 जानेवारी 2025 रोज रविवारला चंद्रपूर रोड वरील श्री. घोगरे सभागृह कनेरी येथे दुपारी ठीक १=०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी माननीय दादाजी पाटील संग्रामे, उद्घाटक म्हणून माननीय डॉ. परसराम खुणे, पद्मश्री अवार्ड भारत सरकार तर प्रमुख अतिथी म्हणून विवेक नाकाडे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली, डॉक्टर आशिष खुणे, डॉक्टर मनीष पर्वते ,डॉक्टर स्नेहा नाकाडे,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत यावेळी मागील जमाखर्च, स्त्रियांकरिता सामूहिक हळदीकुंकू, सत्कार समारंभ, समाजाच्या विकासाबद्दल चर्चा, मनोरंजनात्मक व बौद्धिक खेळ इत्यादी विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत तरी परिसरातील सर्व कोहळी बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष खुशाल मस्के यांनी केले आहे.

