तुमसर आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रमात प्रतिपादन
जयेंद्र चव्हाण
भंडारा जिल्हा प्रतिनिधी
मो.9665175674
भंडारा -घनरूप ,वायूरूप आणि द्रवरूप हे तीन प्रकारचे इंधन आहेत. भारतात इंधनाचा साठा कमी आहे. म्हणून इंधनाची आयात करावी लागते .इंधन बचतीत आपण विजेची बचत करणे, सिलेंडरचा वापर योग्य रीतीने करणे ,वाहने कमी वापरावी, सायकलचा नियमित वापर करावा .भविष्यात इंधन पुरवठा राहील की नाही हे सांगता येणे कठीण आहे म्हणून इंधन बचत करणे हे गरजेचे आहे ती प्रत्येक भारतीयाची नैतिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन प्राचार्य राहुल डोंगरे (शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय तुमसर) यांनी केले. ते प्रमुख वक्ते म्हणून तुमसर आगारात “इंधन बचत मासिक कार्यक्रमात “बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कन्हैया भोगे आगार प्रमुख, प्रमुख अतिथी म्हणून उल्हास भुई विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी, विभागीय लेखापाल मधुसूदन वाघाये , वाहतूक पर्यवेक्षक अन्सारी जावेद अतिथी म्हणून उपस्थित होते.
प्राचार्य राहुल डोंगरे पुढे असे म्हणाले की ,इंधन बचत करतांना प्रथम आपण आपल्या घरातील विजेची बचत केली पाहिजे .टीव्ही ए.सी.,लाइट्स, पंखे यांचा वापर करताना काळजी घेतली पाहिजे. विनाकारांचा आपण या वस्तू चालू ठेवल्या तर वीज वाया जाईल. जेव्हा आपण सिग्नलला गाडी थांबवतो तेव्हा गाडी बंद केली पाहिजे .बरेच लोक सिग्नलला थांबल्यावर गाडी चालूच ठेवतात त्यामुळे भरपूर प्रमाणात पेट्रोल डिझेल वाया जाते .गाडी पार्किंगला लावताना गाडीच्या पेट्रोलच्या कॉक बंद केला पाहिजे .इंधन जर संपले किंवा जर आपण त्याचा वापर योग्य रीतीने केला नाही तर इंधना शिवाय जगणे खूप अशक्य आहे .यासाठी इंधन बचतीसाठी आपल्या देशात वेगवेगळ्या ठिकाणी अर्थात शाळा ,कॉलेज ,सामाजिक संस्था व इतर ठिकाणी इंधन बचतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले पाहिजे .जण जागृती केली पाहिजे . इंधन बचत करणे ही खरी देशभक्ती आणि राष्ट्रीय कार्य आहे,असे मार्मिक उदगार यावेळी प्रकट केले.
कार्यक्रमाचे संचालन गजानन मोटघरे वाहतूक नियंत्रक यांनी केले.प्रास्तविक अन्सार जावेद यांनी केले.आभार प्रमोद बारई लेखापाल यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज मोटघरे,चंद्रकांत सेलोकार, सुनील दिपटे, तेजराम राऊत, भगवान दिवटे ,नीलकंठ बांते, रजनी तितिरमारे ,राजू ठाकरे, एस बी भोंडेकर , ओ.एस. गौतम, सी.बी .बांडेबुचे ,शिल्पा उरकुडे ,रीना गौपाले,सोनाली फुणे ,सविता पचारे , रवीता आ, गायत्री कावळे ,कपिल लांबट आदींनी परिश्रम घेतले.

