२० ते २९ जानेवारीपर्यंत कॅम्प बंद राहणार
तालुका प्रतिनिधी अहेरी विवेक बा मिरालवार 8830554583-कमलापुर – वाढत्या थंडीमुळे हत्तीच्या तळपायाला भेगा पडतात. चालताना त्यांना त्याचा त्रास होतो. त्या भेगांवर आणि दुखऱ्या पायांवर उपचारासाठी त्यांना वैद्यकीय सुटी देण्यात आली आहे. अशी सुटी त्यांना दरवर्षीच देण्यात येते. या १० दिवसांत त्यांच्या पायांना चोपिंग औषधांचा शेक दिला जातो.
४०-४५ प्रकारच्या जडीबुटींपासून औषध तयार केले जाते. त्यासाठी हिरडा, बेहडा, सुंठ, त्रिफळा, जायफळ, आसमंतारा अशा वेगवेगळ्या वनस्पतींचा वापर करून एका डममध्ये चोपिंगचा लेप तयार
करतात. तो करून सकाळच्या पहाटेला व सायंकाळी हत्तीचे पाय शेकतात. महाराष्ट्रातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प असलेल्या कमलापूर येथील हत्तींना बघण्यासाठी विविध राज्यातील अनेक पर्यटक येत असतात. मात्र सध्या ही १० दिवसांसाठी कॅम्प बंद राहणार असल्याची माहिती
प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरवर्षी या काळात हत्तींना आराम देऊन त्यांच्या पायांना चोपिंग केले जाते
हत्ती कॅम्पमधील हत्तींना चोपिंग करण्यात येत असल्याने सध्या दहा दिवसांसाठी हत्ती कॅम्प बंद राहणार आहे. तरी पर्यटकांनी याची नोंद घ्यावी.
– पी. बी. झाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी कमलापूर
– दहा दिवस चालणाऱ्या य चोपिंगमध्ये हत्तींची विशेष काळजी केले जाते. त्यादरम्यान त्यांच्या प्रकृतीची तपासणी व रक्त तपासणी केले जाते.
– डॉ. महेश येमचे, पशुवैद्यकीय वन्यजीव अधिकारी कमलापूर.

