प्रश्न मला एक पडला
प्रेम करणे इतके सोपे आहे का?
प्रेमाची परिभाषा सगळ्यांनाच समजते
हे सत्य आहे का ?……1
मी तुझ्यावर प्रेम करतो
हे म्हणने सोपे असते
पण हृदयातील सत्य समजून घ्यायला
काळीज मोठे लागते….2
प्रेमाची इच्छा प्रत्येकाला असते
प्रेमात पडणे काय चुकीचे असते
प्रेम हे हृदयातून होत असते
ते ठरवून करायचे नसते…3
प्रेम घ्यावे प्रेम द्यावे
स्वार्थी जगाला विसरून जावे
जीवन आहे क्षणभंगुर वेड्या
गाणे हे गातच राहावे
गातच राहावे……4
कवयित्री सौ. वैजयंती विकास गहूकर
योगा टीचर जिल्हा. चंद्रपूर

