कोल्हापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दिनांक : २१ जानेवारी २०२४ गट कार्यालय सांगलीचे कामगार कल्याण अधिकारी मा. संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाने कामगार कल्याण केंद्र तासगाव वतीने एसटी डेपो सांगली वर्कशॉप मधील कामगारांसाठी एस टी डेपो सांगली येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
कोल्हापुर येथील कार्पोरेट ट्रेनर मा. डॉ. प्राध्यापक राजन पडवळ यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी ड्रायव्हर व कंडक्टर यांच्या कामाच्या वेळेत जास्त ताण असतो कंडक्टरला गाव बदलले की माणसे बदलतात ड्रायव्हरलाआपल्या सोबत साठ माणसे घेऊन रस्त्याच्या गर्दीतून बस चालवावी लागते हा तर रोजच्या कामाचा ताण असतोच याला पर्याय नाही त्याच्यावर कशी मात करायची याचे मोलाचे मार्गदर्शन केले बाकीचे ताण कसे घालवायचे याचे मार्गदर्शन झाले ताण घेतला की प्रत्येकाचे रागाने बोलणे वागणे ही बदलते,हे ताण मनासिक आरोग्यावर कसे परिणाम करतात हे सांगत ज्या वेळी ताण येतो त्यावेळी शरीरात ताण घालवण्यासाठी कोणती कामगार व ट्रेनर यांच्यामध्ये हसत खेळत चर्चा झाली सर्व कामगारांच्या व अधिकाऱ्यांच्या या मार्गदर्शनाबद्दल उत्कृष्ट प्रतिक्रिया प्राप्त झाल्या अशा अनेक बाबी सांगताना हसतखेळत विनोदी शैलीत आणि सोदाहरण महिती दिली. यावेळी एस टी मंडळाचे सांगलीचे डेपो मॅनेजर माननीय राजेंद्र घुगरे असिस्टंट डेपो मॅनेजर शितल माने इ. उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजनात केंद्र संचालक संगसेन जगतकर यांनी महत्वाचे योगदान दिले.
मा. मनोज पाटील, सहाय्यक कल्याण आयुक्त, पुणे यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने कार्यक्रम व्यवस्थित पार पडला.

