कांग्रेस नेते माजी जि. प. अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांचा लोहखनिज लिज सुनावणी संदर्भात मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन.

0
128

तालुका प्रतिनिधी अहेरी विवेक बा मिरालवार 8830554583 अहेरी- मागील अनेक वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यातील सरजागड पहाडीवर लोहखनिजाचे उतखंनंन चालू आहे आणि दरवर्षी स्थानिक जनतेला विचारात घेण्यासाठी जण सुनावणी घेण्यात येतो. परंतु यावर्षी जणसुनावणी ही एटापल्ली येथे न घेता स्थानिक लोकांना डावलून जिल्हा मुख्यालयी 200 कि. मी. अंतरावर घेण्यात येत आहे. व एटापल्ली तालुक्याची भाग्यलक्ष्मी मानल्या जाणाऱ्या बांदे नदीच्या पाण्याचा वापर करून कच्चा माल कोणसरी येथे पाठवण्यात येणार आहे. यामुळे तालुक्यातील जणजीवन विस्कळीत होणारआहे. या सर्वांना आळा घालण्यात यावा तसेच जणसुनावणी ही एटापल्ली येथे घेण्यात यावी.

अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम यांनी मा. अप्पर जिल्हाधिकारी अहेरी यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा पालकमंत्रीगडचिरोली यांना केली. यावेळी नागपूर विभागीय अध्यक्षा शरद पवार गट शाहीनजयरुद्दीन हकीम, सिनू वीरगोणवार, नगरसेवक अमोल मुक्कावार, नगरसेकेक श्रीनिवास चटारे, रहेमान शेख, बाबू भैया, अनुराग बेझलवार, सुमित मोतकुरवार, शैलेश गेडाम, टाटाजी गेडाम, नामदेव पेंदाम सर, राहुल दुर्गे, अमोल रामटेके, रामू कस्तुरवार, अफसर खान, अक्षय कवीराजवार, भारत गलबले, सागर मडावी व मोठ्या संख्येने रा.का.पार्टी शरद पवार गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here