prabodhini news logo
Home अहेरी मा. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन

मा. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन

0
127

तडगुड ते खादला प्रवास होईल सुखकर…

तालुका प्रतिनिधी अहेरी विवेक बा मिरालवार 8830554583-तालुक्यातील मौजा – ताडगुडा ते खांदला या गावांना जोडणारा रस्त्याचा भुमीपुजन हे महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते भुमीपुजन करण्यात आला.

सदर रस्ता हे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत रस्ता मंजुर करण्यात आले आहे. त्यामुळे आता मौजा आरेंदा पासुन ते ताडगुडा, कोरेपल्ली, खांदला, राजाराम, रायगटटा, गोलाकर्जी या गावांना जोडणारा NH353C रस्ता पक्का रस्ता बनणार आहे. वरील गावासह त्या परिसरातील इतरही गावातील नागरिकांना चांगला सुविधा होणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आमदार डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम साहेब यांना धन्यवाद करून आनंद व्यक्त केलेला आहे.

यावेळी उपस्थित, अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, अहेरी कृषी बाजार समितीचे सभापती – रवींद्र बाबा आत्राम, पिएमजीएस चे इंजिनियर राजेश बोम्मावार, रा.यु.काँ. चे जिल्हा सचिव – बालाजी गावडे, राष्ट्रवादीचे अहेरी विधान अध्यक्ष – लक्ष्मण येररावार, अरुण मुक्कावार सामाजिक कार्यकर्ता, सुरेंद्र आलोने – सामजिक कार्यकर्ता, सत्यनारायण येगलोपवार, जाई गावडे, बाबुराव तलांडी, अमर गावडे, मुर्रा आत्राम, बंडू दहागावकर, दस्सा आत्राम, व्येंकाटेश तलांडी, रामा गावडे, भिमराव सडमेक, यशवंत कोडापे, तुकाराम ईस्टम, पिंटू झाडे, रामजी आत्राम, मादी आत्राम, वारलु तलांडी, सुधीर आत्राम, बाला कुळमेथे, दामा गावडे, राजु तलांडी, सतीश आत्राम, मंगेश कुळमेथे सह राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे कार्यकर्ते आणि ताडगुडा गावातील महिला व पुरुष उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here