तालुका प्रतिनिधी अहेरी विवेक बा मिरालवार – अहेरी – शहरात किमान सहा महिण्यांपासुन सतत अस्वच्छ पाणी पुरवठा होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत सुरु असलेल्या पाणी पुरवठ्याबाबत नेहमीच ओरड सुरु असते. खंडीत पाणी पुरवठा,अपुरा पुरवठा,कमी दाब,अस्वच्छ अथवा घाण पाणी अशा असंख्य तक्रारी प्राधिकरणाच्या बाबतीत सतत सुरू असतात परंतू जीवन प्राधिकरणावर नगर पंचायत प्रशासनाच्या अधीकार क्षेत्रात येत नाही परंतू जनतेच्या प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन भाजपच्या पदाधिकार्यांनी जीवन प्राधिकरणच्या अधिकार्यांशी चर्चा करुन गढुळ पाण्याची समस्या तात्काळ निकाली लावण्यासंबंधी सुचना केली. प्राणहिता नदीचे पाणी प्रक्रीया करुन अहेरी शहराला पुरविल्या जाते परंतू जेव्हा जेव्हा धरणातील साचलेले पाणी सोडण्यात येते तेव्हाच हिरव्या रंगाचे पाणी शहराला मिळते.तुरटीने गाळ बसविणे व क्लोरीन,ब्लिचींग व तत्सम रसायनांमार्फत निर्जंतुकीकरण करणे एवढेच शासणाचे मार्गदर्शक तत्वे असतात त्यानुसारच काम सुरु असल्याचे अधिकार्यांनी सांगीतले परंतू या प्रक्रीयेमार्फत निर्जंतुक पाणी पुरवता येते परंतु पाण्याचे रंग बदलुन देण्यासाठी काहीही सुविधा नसल्याची कबुली अधिकार्यांनी दिली.
नागरीकांना अपायकारक पाणी पुरवठा झाल्यास पुन्हा मोठे आदोलन करण्यात येईल असा इशारा भाजप पदाधिकार्यांनी दिला.

