Home ठळक बातम्या राजारामनगर महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर संपन्न..

राजारामनगर महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर संपन्न..

0
113

जगदीश वडजे नाशिक जिल्हा प्रतिनिधी – कर्मवीर रा.स.वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्थेचे कला, वाणिज्य आणि विज्ञान राजारामनगर महाविद्यालयाच्या सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप काल दि. 24/01/2025 रोजी कादवा कारखाना कॉलनी राजारामनगर येथे संपन्न झाला. शिबीर समारोप प्रसंगी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय शहाजी दादा सोमवंशी हे अध्यक्षस्थानी होते. समवेत संस्थेचे सचिव मा. बाळासाहेब उगले, कादवा कारखान्याचे जेष्ठ संचालक मधुकर अण्णा गटकळ, विश्वनाथ सुदामराव देशमुख, संपतराव घडवजे, राजेंद्र देविदास गांगुर्डे, कार्यकारी संचालक विजय माधवराव खालकर , कारखाना सचिव राहुल उगले, व्यवस्थापन समिती सदस्य गंगाधर खंडेराव निखाडे, ग्रामस्थ संजय शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना या श्रमसंस्कार शिबिरांच्या माध्यमातून एक नवी संस्कारक्षम पिढी घडावी असा आशावाद अध्यक्षीय भाषणातून मा. सोमवंशी यांनी व्यक्त केला. त्यासाठी शिक्षकांनी पुढे येऊन महाविद्यालयीन अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना अनुभवजन्य ज्ञानाचे धडे देणे गरजेचे आहे असे सांगितले. त्यातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल व उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारेल असे प्रतिपादन त्यांनी केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.गवळी एन.व्ही, नॅक समन्वयक प्रा. सोनवणे ए.ए, डॉ.पाटील एस.ए, श्रीमती लोखंडे आर.बी, गांगुर्डे आर.ए, कावळे पी.व्ही, खैरनार वाय.आर, शेखरे जे.एस, प्रा.दाभाडे एस.के, प्रा. इंगळे ए.ए, प्रा. दुगजे पी.बी, रा.से.यो.कार्यक्रम आधिकारी प्रा. पवार एस.के, सहाय्यक प्रा.बारहाते एस.बी, सहाय्यक प्रा.कुमारी एन.डी, शिक्षकेतर कर्मचारी कुमारी जाधव एस. एस, धुळे जी.के, विद्यापीठ प्रतिनिधी धनंजय मातेरे तसेच विद्यार्थी स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here