जगदीश वडजे नाशिक जिल्हा प्रतिनिधी – कर्मवीर रा.स.वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्थेचे, कला, वाणिज्य आणि विज्ञान राजारामनगर महाविद्यालयास नुकत्याच झालेल्या नॅक मूल्यांकन प्रक्रियेत CGPA- 2.43 अर्थात ‘B’ श्रेणी प्राप्त झाली आहे. महाविद्यालय नॅक मूल्यांकनाची ही प्रथम वेळ (1st Cycle)असताना चांगली श्रेणी मिळाल्याबद्दल परिसरातील अनेक स्तरांतून महाविद्यालय व संस्थेचे अभिनंदन केले जात आहे.
गेल्या दोन-तीन वर्षापासून पूर्वतयारी सुरू असताना अनेक अडी-अडचणींवर मात करून अखेरीस महाविद्यालय व संस्था प्रशासनास हे यश मिळाले. हे यश मिळवण्यामागे कादवा कारखान्याचे चेअरमन व या महाविद्यालयाचे संस्थापक आदरणीय श्रीराम शेटे यांचे मार्गदर्शन, संस्थेचे विद्यमान अध्यक्ष माननीय शहाजीदादा सोमवंशी व सचिव बाळासाहेब उगले यांचे पाठबळ मोलाचे ठरले. वेळेवर सर्व पायाभूत सोयी-सुविधांची उपलब्धता त्यांनी संस्था स्तरावरून करून दिली.
…महाविद्यालय स्तरावरून सर्व स्टाफने कठोर मेहनत घेऊन संस्थेस हा गौरव प्राप्त करून दिला. यामुळे संस्थेच्या नाव-लौकिकात आणखी एक मानाचा शिरपेच खोवला गेला.
महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने प्राचार्य, नॅक समन्वयक, क्रायटेरियांचे प्रमुख व त्यांचे सहाय्यक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यात महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.आर.टी. जाधव, आजी प्राचार्य प्रा.एन.व्ही.गवळी, नॅक समन्वयक प्रा.ए.ए. सोनवणे, प्रा. डॉ.एस.ए. पाटील, आर.बी. लोखंडे, एम.डी.वाघ, आर.एल. गांगुर्डे, पी.व्ही.कावळे, एस.बी.गटकळ, एस.एन.गोरे, कुमारी वाय.आर. खैरनार, कुमारी एन.डी.डोखळे, कुमारी जे.एस.शेखरे, प्रा. एस.के.पवार, एस.बी.बारहाते, पी.बी.दुगजे, एस.के.दाभाडे,ए.ए.इंगळे, आर.एस दाणे, पी.ई.नवले, शरद दुगजे, एन.सी.ढगे, एस.बी. घोरपडे, एस.एन. भुसाळ तसेच शिक्षकेतर कर्मचारी एस.एस.जाधव, शिवाजी गवळी, सागर उगले, सौरभ मोरे, प्रवीण शेटे, जी.के.धुळे, दत्तू डंबाळे, गोविंद दळवी आदींचे सहकार्य व योगदान लाखमोलाचे ठरले.

