कचरू मानकर गोंडपिपरी शहर प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज नेटवर्क 9370676939 – गोंडपिपरी तालुक्यातील वेडगांव इथे 26 जानेवारी 2025 ला सकाळी 7:45ते 9:45 दरम्यान भारतीय स्वातंत्र्याचा 76व्या प्रजासत्ताक दिन मोठ्या थाठा माठात उत्सहाणे साजरा करण्यात आला. 1.ग्रामपंचायत कार्यालय वेडगांव येथे माननीय सरपंच धिरेंद्र नागापुरे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले 2. जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळा वेडगांव येथे मा. कचरू कोंडेकर मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आला 3. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वेडगांव येथे मा. डॉ. जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाला या कार्यक्रमाला खूपच जनतेचा प्रतिसाद होता तसेच या कार्यक्रमाला किसान विद्यालय वेडगांव चे सर्व शिक्षक व विध्यार्थी उपस्थित होते.
सदर गावातील प्रतिष्ठित नागरिक व प्रमुख पाहुणे मा. प्रदीप नारनवरे ग्रामपंचायत अधिकारी, संगिता राऊत उपसरपंच, शुभांगी मानकर सदस्या,करिष्मा ठुसे सदस्या, भावना धुडसे सदस्या, गुरूदास झाडे सदस्य, ग्रा म तंटामुक्ती समितीचेअध्यक्ष दिलीप धुडसे, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा प्रांजली मडावी, राठोड साहेब मलेरिया विभाग कर्मचारी , किसान विद्यालय वेडगांव मा. मुख्याध्यापक कस्तुरे , शिक्षक नगराळे , शिक्षक कच्युवाई , शिक्षक अमर झाडे , शिक्षक पाचभाई,तसेच किसान विद्यालय वेडगांव येथील सर्व शिक्षक वृंद आणि विध्यार्थी उपस्थित होते, तसेच गावातील मा पोलीस पाटील साहेब सिद्धार्थ झाडे ,तसेच ग्रामपंचायत वेडगांव येथील माझी व आजी कर्मचारी वृंद समस्त वेडगांव वासीय उपस्थित होते.तसेच वेडगांव येथील जेष्ठ नागरिक व मान्यवर उपस्थित होते आणि प्रोबोधिनी न्यूज नेटवर्क चे कचरू मानकर यांनी समस्त वेडगांव व गोंडपिपरी शहर वासियांना भारतीय प्रजासत्ताक दिन अमृत महोत्सव वर्ष समरोप प्रसंगी महाराष्ट्र व भारत वासियांना 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

