कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख 9860910063 – कै.सौ. सुशिलामाई काळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित ‘वक्तृत्व स्पर्धाचा’ बक्षीस वितरण समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आज उपजिल्हाधिकारी मा. सायलीताई सोळंके यांच्या प्रमुख उपस्थितीत व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका मा. चैताली काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस पटकावलेल्या व विद्यालयात विविध विभागात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुण चंद्रे, संभाजी काळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कचरुजी कोळपे, उपाध्यक्ष बाळासाहेब ढोमसे, सदस्य डॉ. आय.के. सय्यद, माता – पालक समितीच्या अध्यक्षा वहाडणे, छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य चौरे, राधाबाई काळे कन्या विद्यालयाच्या प्राचार्या एच.एन. गुंजाळ, छत्रपती संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक पाचोरे, माजी प्राचार्य सुकदेव काळे, शेख सर, रमेशजी मोरे, पोपटराव येवले, सतीशजी नरोडे, भाऊसाहेब लुटे, आबासाहेब आभाळे आदी मान्यवरांसह शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

