कवी संदीप जगताप यांच्या उपस्थितीत राजारामनगर महाविद्यालयाचा गुणगौरव समारंभ संपन्न…*

0
80

नाशिक जिल्हा प्रतिनिधी जगदीश वडजे नं. 9175794502
कर्मवीर रा.स. वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान राजारामनगर महाविद्यालयाचा वार्षिक गुणगौरव समारंभ (दि.३१/०१/२०२५ रोजी) चिंचखेडचे सुप्रसिद्ध कवी संदीप जगताप सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. शहाजीदादा सोमवंशी हे अध्यक्षस्थानी होते. समवेत कादवा कारखान्याचे व्हा. चेअरमन आदरणीय शिवाजीदादा बस्ते, संस्थेचे सचिव मा. बाळासाहेब उगले, व्यवस्थापन समिती सदस्य वसंतरावजी कावळे, गंगाधरजी निखाडे, राहुल भाऊ कावळे, कारखान्याचे कार्यकारी संचालक मा. विजयजी खालकर, बी.के.कावळे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.विलास जाधव, प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री.अशोक शिंदे, कादवा तंत्रनिकेतनचे स्वप्निल देशमुख, कैलास अपसुंदे व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.नंदू गवळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आपल्या प्रेरणादायी व्याख्यानातून कवी संदीप जगताप यांनी विद्यार्थ्यांना..”फक्त नोकरी मिळविणारे शिक्षण घेण्यापेक्षा उद्योजक निर्माण करणारे शिक्षण घ्या, गुलामगिरी करण्यापेक्षा स्वतः मालक होण्याची स्वप्ने बघा आणि ते वास्तवात उतरविण्यासाठी नव्या वाटा- नव्या दिशा- नव्या संधी शोधा. त्यासाठी जिद्द व प्रयत्नांची पराकाष्ठा करा आणि यश मिळवा. ज्यामुळे मराठी माणूस व्यावसायिक क्षेत्रात मागे पडतो आहे; ती मानसिकता व मनस्थिती बदला. स्वतःच्या पायावर उभे राहा. आपल्या बापाची मान कुणापुढेही झुकू देऊ नका. स्वाभिमानाने राहा. आपली परिस्थिती आपण स्वतः बदला आणि आपले ध्येय गाठा..!” असा मूलभूत व मौलिक संदेश दिला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे नॅक समन्वयक प्राध्यापक अविनाश सोनवणे, डॉ. सुजाता पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख रमाबाई लोखंडे, सोमनाथ पवार, शहाजी बारहाते, रोहिणी गांगुर्डे, पुष्पा कावळे, युगंधरा खैरनार, निशा डोखळे, गीता पासारे, गौतमी पवार, ज्योती शेखरे, परितोष दुगजे, स्वप्निल दाभाडे, अजय इंगळे, शिक्षकेतर कर्मचारी श्रुती जाधव, गोपाळा धुळे, सुजान मणियार यांनी प्रयत्न केले. यावेळी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here