जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा – तुमसर येथील डुंभरे ज्वेलर्सतर्फे आयोजित “भाग्यलक्ष्मी उपहार महोत्सव बंपर जॅकपॉट सोडत – 2025” चा भव्य सोहळा आमंत्रण लॉन, तुमसर येथे उत्साहात पार पडला. या सोडतीत अंबादास गभने (रा. परसवाडा, देव्हाडी) हे लकी ड्रॉद्वारे बंपर जॅकपॉटचे विजेते ठरले आणि त्यांनी क्विड कंपनीची चारचाकी कार जिंकली.
अंबादास गभने हे सनफ्लॅग कंपनीत कंत्राटी कामगार आहेत. त्यांनी 5 ऑक्टोबर ते 31 जानेवारी या कालावधीत डुंभरे ज्वेलर्समधून 30,000 रुपयांचे सोने खरेदी केले होते, ज्यामुळे त्यांना या सोडतीत सहभागी होता आले.
या भव्य सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे आमदार राजुभाऊ कारेमोरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी माजी खासदार मधुकरजी कुकडे, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संतोष कोचर, माजी नगराध्यक्ष इंजी. प्रदीप पडोळे, माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
डुंभरे ज्वेलर्सच्या संध्याताई सुभाषराव डुंभरे, राजेश मर्जिवे, मंगेश डुंभरे, नितीन डुंभरे, अतुल कुंभरे यांच्यासह संपूर्ण डुंभरे परिवाराने या महोत्सवाचे उत्कृष्ट आयोजन केले.
लकी ड्रॉमध्ये 36 ग्राहकांना 10 ग्रॅम चांदीची नाणी मिळाली. तसेच काही विजेत्यांना वॉशिंग मशीन, डबल डोअर फ्रिज, टीव्ही, तीन स्मार्टफोन यासारखी आकर्षक बक्षिसे मिळाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी डुंभरे परिवाराचे अभिनंदन केले. विजेते ठरलेल्या अंबादास गभने यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

