ताटीकोंडावार यांची मुख्य वनसंरक्षकांकडे तक्रार
तालुका प्रतिनिधी अहेरी विवेक बा मिरालवार 8830554583 – अहेरी उपविभागात मोठ्या प्रमाणात वनजमिनींवर अतिक्रमण करुन हडप करण्याचे प्रकार सुरु आहेत. हा प्रकार वनविषयक धोरणाचे उल्लंघन करणारा असतानाही अहेरी शहरालगतच्या वनजमिनीवर काही श्रीमंतांनी अतिक्रमण करुन भूखंड विकसित केले असल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात जनकल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी मुख्य वनसंरक्षकाकडे तक्रार केली आहे.
या तक्रारीत म्हटले आहे की, वनविभागाच्या जमिनीवर काही श्रीमंत व्यक्ती व राजकीय पुढाकारंनी अतिक्रमण केले असून, शासनाची दिशाभूल केली आहे. यात माजी जि. प. अध्यक्षा आशा पोहणेकर यांचा उल्लेख करीत, त्यांनीही वनविभागाच्या सर्वे क्र. 120 वर अतिक्रमण केल्याचा दावा त्यांनी केला आहे. वनजमिनीवरील अतिक्रमणामुळे वनसंपत्ती नष्ट होत आहे. त्यामुळे या जमिनीची आणि अतिक्रमणग्रस्त जमिनीची चौकशी करुन सीमांकान करुन सर्वेक्षण करावे, अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींवर वनसंरक्षण कायद्यानुसार गुन्हे
दाखल करुन कठोर कारवाई करावी, अतिक्रमित जमिनीवर मोठ्या प्रमाणात रोपवन लावून क्षेत्राचे संर्वधन करावे, सादर जमिनी वनविभागाच्या योजनांमध्ये नसतील तर गरीब आणि भूमिहीन नागरिकांना एक हजार चौ. फुटचे 100 प्लॉट मोफत वाटप करवो, अशी मागणीही ताटीकोंडावार यांनी मुख्य वनसंरक्षकाकडे केली आहे.

