तालुका प्रतिनिधी अहेरी विवेक बा मिरालवार 8830554583- जिंमलगट्टा – सिरोंचा -आलापल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात निकृष्ट गिट्टी, तसेच डस्टची आयात केली जात आहे. या दर्जाहीन साहित्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होऊन, आतापासून या रस्त्याची वाट लागल्याचे चित्र दिसत आहे. या प्रकरणाची तज्ज्ञांमार्फत सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टीने केली.
तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन पाठविण्यात आले. याद्वारे चौकशीची मागणी करण्यात आली. निवेदनात निवेदनात विविध मुद्यांचा समावेश आहे.
तर आंदोलन छेडणार ३५३ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग बांधला जात आहे.
तेलंगणा राज्यातून आयात होणाऱ्या गिट्टी व डस्टच्या भ्रष्ट कारभाराची तज्ज्ञांद्वारे तपासणी करून कारवाई करावी. तसेच हे साहित्य आणणे थांबवावे, अन्यया बीएसपीच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.असा इशारा येथील लोकांचा देण्यात आले.
संबंधित कंत्राटदार व तेलंगणातील आयात करणारा व्यक्तीच्या संगनमताने हा अवैध प्रकार सर्रास सुरू आहे. दर्जाहीन साहित्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट होत असल्याचे दिसून येत आहे, असा आरोपही करण्यात आला.

