उषा पानसरे
मुख्य कार्यकारी संपादीका
प्रबोधनी न्युज अमरावती
चिखलदरा दिनाक ९ /२ चिखलदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका महीलेची प्रचड मारहाण करून गावातून धिंड काढण्याचा प्रकाराने संपूर्ण राज्यात खळबळ माजवण्यार्या रेटयाखेडा येथिल प्रकरणात चिखलदरा पोलिस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार आनंद पिदूरकर दोन पोलिस हेड काॅन्स्टेबल आणि एक महीला पोलिस शिपायाला निलंबित करण्यात आले. अमरावती विभागाचे विषेश पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी हा आदेश जारी केला आहे एसडीपीओ सिध्देश्र्वर धूमाळ यांच्या अहवालाची दखल घेत ठाणेदार सह अन्य पाच पोलिसांना एक फेब्रूवारी रोजी बदली करून पोलिस मुख्यालयात संलग्न करण्यात आले होते त्या नंतर तब्बल पाच दिवसांनी म्हणजेच गूरूवार दिनांक ६ /२/ २०२५ ला त्यांना विलंबित करण्यात आले. चिखलदरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार आनंद पिदूरकर ‘पोलिस हेड काॅन्स्टेबल दिपक सोनाळकर भीमसिंग उईके ‘ महीला काॅन्स्टेबल प्रमिला जामकर यांना विलंबित करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. कर्तव्यात कसूर केल्याच्यां निलंबित करण्यात आल्याने पोलिस वर्तूळात एकच खळबळ उडाली.

