सुभाष दरेकर जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर प्रबोधिनी न्युज 9858322466 – श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली या निवडणुकीत आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी बाजी मारली निवडणुकीनंतर लगेच आभार दौरा करायचे ठरले परंतु सरकार चा शपथविधी सोहळा , हिवाळी अधिवेशन, शिर्डी येथे पक्षाचा मेळावा पार पडला त्यामुळे उशिरा दौरा सुरू करून आज सकाळी अकरा वाजता हिरडगाव येथे आभार दौरा पार पडला तुकाई माता मंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी प्रथम गावकऱ्यांचे मताधिक्य दिल्या बद्दल आभार मानले व गावातील सर्व कार्यकर्त्यांच़्या समस्या जाणून घेतल्या व गावाच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहीन गटतट बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र काम करू असे आश्वासन दिले कुकडीचे आवर्तन, बंद असलेल्या रस्याचे काम , शिवरस्ते याबाबत चर्चा झाली!आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचा गावाच्या वतीने चेअरमन विजय भुजबळ व सरपंच रामदास बनकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
यावेळी प्रस्ताविक संतोष दरेकर यांनी केले तर आभार सुभाष दरेकर यांनी मानले काष्टी सोसायटी माजी मॅनेजर बाळासाहेब दरेकर यांनी बोलताना माजी मंत्री आ बबनराव पाचपुते यांच्या काळातील कामावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला भालचंद्र भुजबळ यांनी आपल्या भुजबळ वस्ती घोडेगाव रस्ता व विजेचा प्रश्न मांडला या कार्यक्रमाला आमदार विक्रमसिंह पाचपुते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संदीप नागवडे बाळासाहेब महाडिक रमेश गिरमकर महेश दरेकर तसेच गावातील संपतराव दरेकर देविचंद भुजबळ चेअरमन विजय भुजबळ व्हा चेअरमन नवनाथ गुणवरे व उपसरपंच अमोल दरेकर चिमाजी दरेकर बाळासाहेब शिंदे वसंत दरेकर आप्पा दरेकर पाटील व सर्व सदस्य ग्रामपंचायत व सर्व संचालक हिरडगाव सोसायटी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते

