भल्या पाहटे रेतीचा ट्रक सोडणाऱ्या चिमुरच्या उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची चौकशी करा

0
136

वंचित युवा जिल्हाध्यक्ष शुभम मंडपे यांची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी

चिमूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि.4 फेब्रुवारी 2025 ला चिमूर येथे अवैध रेतीचे चार हायवा उपविभागीय अधिकारी साहेब तथा तहसीलदार साहेब चिमूर यांनी पकडून कार्यवाही केली. हायवा क्र. MH-27 BX1639, MH-36 AA 2833, MH-40 BG 0590 व इतर एक हायवा असे ऐकून 4 हायवा तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालय चिमूर येथे जमा करण्यात आले होते.जमा करण्यात आलेल्या ट्रक बाबत स्थानिक प्रसार माध्यम प्रतिनिधीनी माहीती विचारली असता दोन हायवाच्या चार ब्रास रायल्टीची माहिती देण्यात आली. मात्र चारही हायवामध्ये 6 ब्रास रेती होती असे दिसून आले व उर्वरित दोन हायवांची माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आला. व भल्या पहाटेच्या सुमारास चारही हायवा तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालयातून सोडून देण्यात आले. सदर कारवाही सकाळीच झाली असल्याने यात स्थानिक प्रशासनावर शंका घेतल्या जातं आहे. या सर्व प्रकारची निपक्ष सखोल चौकशी करण्यात यावी. यांची मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम मंडपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

अवैध रेतीच्या चारही हायवा मध्ये किती ब्रास रेती होती व चारही हायवांची रॉयल्टी किती ब्रासची होती, चारही हायवांची अवैध रेतीचा साठा कुठे जमा केला. याची सर्व चौकशी करण्यात यावी व काही त्रुटी आढळल्यास संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर कारवाही करण्यात यावी व तहसील कार्यालयातील परिसरात शासकीय कामावर अवैध रेतीची साठवून केली आहे व चिमूर तालुक्यातील सर्व शासकीय कामावर अवैध रेतीचा साठा आढळून येत आहे व संपूर्ण चिमूर तालुक्यात अवैध रेतीचा उपसा केला जात आहे तरी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी याची मागणी जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे व निवेदनाची प्रतिलिपी मुख्यमंत्री, उपमुख्यामंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री व चिमुर विधानसभेचे आमदार यांनाही पाठविणात आली आहे.
या प्रकरणाची तात्काळ चौकशी न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर समोर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल याचा इशाराही देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here