prabodhini news logo
Home चंद्रपूर चंद्रपूर येथे राजा भोज जयंती उत्सव संपन्न

चंद्रपूर येथे राजा भोज जयंती उत्सव संपन्न

0
152

भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर – चंद्रपूर – दिनांक: 9 फेब्रुवारी 2025 रोजी राजा भोज सभागृह दुर्गापूर, चंद्रपूर येथे वैभवशाली क्षत्रिय चक्रवर्ती सम्राट राजा भोज जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या भव्य कार्यक्रमात राजा भोज यांच्या मूर्तीची स्थापना व अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार मा. खुशाल बोपचे यांच्या हस्ते मूर्तीचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मा. अरुण रहांगडाले, डॉ. गिरधीलाल येडे, रमेश चंदुलाल बीसेन, लीलाधर रहांगडाले, श्रीनिवास जंगमवार, नितीन भटारकर, संजय यादव आणि पूजा मानकर यांची उपस्थिती होती.

राजा भोज: एक महान शासक आणि विद्वान

परमार वंशाचे राजा भोज (1010-1055) हे मध्य भारतातील धार येथील एक प्रसिद्ध राजा होते. त्यांच्या कारकीर्दीत कला, साहित्य, विज्ञान आणि वास्तुकलेला विशेष प्रोत्साहन मिळाले. स्वतः एक विद्वान असलेल्या राजा भोज यांनी अनेक संस्कृत ग्रंथांची रचना केली, ज्यामध्ये व्याकरण, काव्य, वास्तुशास्त्र आणि दर्शनशास्त्र या विषयांचा समावेश होता.

त्यांच्या राज्यात भोजशाळा या नावाने प्रसिद्ध असलेली एक विद्यापीठ होती, जिथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असत. राजा भोज यांनी बांधलेली भोजपूर येथील सरस्वती मंदिर आणि भोजपूर बंधारा ही वास्तुकलेची उत्कृष्ट उदाहरणे आजही पाहायला मिळतात.

राजा भोज यांच्या कार्यकाळात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही महत्त्वपूर्ण प्रगती झाली. त्यांनी लिहिलेल्या ‘समरांगण सूत्रधार’ या ग्रंथात यंत्रविज्ञान आणि वास्तुकलेचे सविस्तर वर्णन आहे. त्यांच्या राज्यात कला, साहित्य आणि विज्ञानाला दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्यांच्या कालखंडाला ‘सुवर्णयुग’ म्हटले जाते.

या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात राजा भोज यांच्या जीवनावर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन लेखलाल जी बिसेन व प्रस्तावना डॉ. शैलेंद्र बिसेन यांनी केले. प्रमुख पाहुणे व सर्व समाज बांधव एकत्र येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल सर्वात शेवट आभार प्रदर्शन रमेश जी चौधरी यांनी केले.क्षत्रिय पवार समाज दुर्गापुर, नेरी, ऊर्जानगर, चंद्रपूर यांच्यावतीने अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here