हा दिनविशेष महत्त्वाचा सखे
मिळो तुला सन्मानाचा झरा निर्मळ
स्वभावाने अमृतमय आहे असा तुझा
व्यक्तित्व प्रखर नी आहे तू सोज्वळ
चेहऱ्यावर स्मितहास्यच राहे
सदाकाळ तुझ्या जगण्यात सखे
जरी असतीलं तुझ्यात वादळ
दिसते शांत प्रशांत समिंदर
गुजगोष्टीची तू ग राणी
चारोळ्याची आहे महाराणी
कवितेचा सार असतो लय भारी
अशीच आहे सखे समृद्ध विचारांनी
घडविते नवीन भविष्याची पिढी
अति दक्षता घेऊन करिते निरूपण
मातीच्या नाजूक बाहुल्यांना देते आकार
असे तुझ्या छवीचे आहे विश्लेषण
तुझ्या मंगलमय दिवसाला मी
देते शुभेच्छा आनंदी हर्षाने
मिळो तुला इच्छितो आशा अभिलाषा
भेट देते तुला सखे फुलांच्या वर्षावाने
कवयित्री रंजना भैसारे
नागपूर

