तालुका प्रतिनिधी अहेरी
विवेक बा मीरालवार
8830554583
अहेरी : तालुक्यातील किस्टापुर येथील स्व.मदनय्या आत्राम क्रिकेट क्लब,किस्टापुर द्वारा भव्य ग्रामीण टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजित केले आहे.सदर आयोजित स्पर्धेचे उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमचे सहउदघाटक म्हणून हनमंतु मडावी आदिवासी सेल जिल्हा अध्यक्ष गडचिरोली हे होते.कार्यक्रमचे अध्यक्ष म्हणून दिलीप मडावी सरपंच ग्रामपंचायत किस्टापुर होते.
यावेळी कार्यक्रमाला प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी,कल्पना मडावी ग्रामपंचायत सदस्या किस्टापुर,संजय आत्राम ग्रामपंचायत सदस्य किस्टापुर,माजी ग्रामपंचायत सरपंच मडावी काका किस्टापुर, वंदना दुर्गे ग्रामपंचायत सदस्य महागाव, ईश्वर सिडाम माजी ग्रामपंचायत सदस्या किस्टापुर, संतोष येरमे,गणेश मडावी,बाबुराव आलाम,कार्तिक तोगम माजी उपसरपंच ग्रामपंचायत मरपल्ली,प्रमोद गोडसेलवार,दिनेश मडावीसह गावातील नागरीक उपस्थित होते.
तसेच त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष बालाजी आलाम,उपाध्यक्ष दिपनेश सिडाम,कोषाध्यक्ष शैलेश आलाम,अरविंद मडावी,सचिव निलेश आलाम,त्रशी येरमे,सहसचिव लालू मडावी,रोहन सिडाम,आयोजक नागेश तोर्रेम,रवींद्र येलमुले,क्रीडा प्रमुख हर्षल मडावी,आशिष पिपरेसह मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

