सुजाता कन्या विद्यालय अड्याळ येथे वर्ग 10 वी च्या विद्यार्थिंनींना आनंददायी निरोप समारंभ

0
72

जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674

भंडारा – पवनी तालुक्यातील सुजाता कन्या विद्यालय अड्याळ येथे वर्ग 9 वी च्या विद्यार्थिनी यांचे वतीने वर्ग 10 वी च्या विद्यार्थिनी यांचेकरिता आनंददायी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भारती गिरडकर ह्या होत्या.प्रमुख अतिथी म्हणून माधुरी मुंडले, शोभिवंत गेडेकर, सहाय्यक शिक्षक एस.आर. नागपुरे, एन. एम. गायधने, के.एम.पचारे, सहाय्यक शिक्षिका कु.उज्वला धुरंधर,प्रतिमा पोटवार, प्रतिमा चाचेरे आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यालयातील इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी सर्व शिक्षकवृंद यांचेवर पुष्पवर्षाव करून स्वागत केले.त्यानंतर वर्ग दहावीच्या विद्यार्थिनी आणि सर्व शिक्षक,शिक्षिका यांचे फुगे देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाप्रसंगी 10 वी च्या सर्व विद्यार्थिनींनी आपआपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी यांनी दहावीच्या विद्यार्थिनींना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेविषयी सविस्तर मार्गदर्शन करून पुढील वाटचालीकारिता शुभेच्छा दिल्या.

विद्यालयाच्या वतीने दहावीतील विद्यार्थिनींना शालेय उपयोगी भेट वस्तू देण्यात आल्या.कार्यक्रमादरम्यान शालेय विद्यार्थिनींनी विविध प्रकारच्या कविता,गिते,संगीत यांचा आनंद लुटला. कार्यक्रमाचे संचालन विद्यालयातील सांस्कृतिक प्रमुख तसेच इयत्ता दहावीच्या वर्गशिक्षिका यु.बी.धुरंधर यांनी केले. सांस्कृतिक प्रमुख उज्वला धुरंधर यांच्या गिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here