कोपरगाव तालुका नवनाथ उल्हारे 7744022677 चासनळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवराव चांदगुडे पा.चासनळी शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नुकतीच आयोजित करण्यात आली होती. सहलीत शिवनेरी किल्ला, वडज धरण, लेण्याद्री, ओझर या स्थळांचा समावेश करण्यात आला होता.एसटी महामंडळाच्या बसने विद्यार्थ्यांनी सहलीचा आनंद लुटला. शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट असलेले शिवनेरी किल्ला,शिवजन्मभुमी,छत्रपती शिवरायांचा पाळणा, शिवाई देवीचे मंदीर तसेच लेण्याद्री येथील प्रसिद्ध लेण्या गणपती दर्शन वडज धरण,ओझर येथील प्रसिद्ध गणपती मंदिर पाहण्याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. शिवनेरी किल्ला पायी चालत तेथील निसर्गाचे निरीक्षण केले.अष्टविनायक पैकी लेण्याद्री व ओझर येथील गणपतीचे दर्शन घेतले. ओझर येथील प्रसादलयातील महाप्रसादाचा लाभ घेतला.बसमध्ये गाणी म्हणत नाचत गात गप्पा मारत मुलांनी एकदिवसीय सहलीचा मनमुराद आनंद घेतला.या सहलीमुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला.शैक्षणिक सहलीच्या यशस्वीतेसाठी सहल प्रमुख मुख्याध्यापक मच्छिंद्र सोनवणे, मिननाथ माळी,संतोष पारासूर, जयश्री मोगरे, साबळे, भीमा गोडे,सिताराम कचरे, पुष्पा चौधरी, वंदना रोकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

