Home चंद्रपूर शिव जयंती निमित्ताने “व्यसनमुक्ती” जाणीव-जागृती कार्यक्रमाचा घेतला लाभ

शिव जयंती निमित्ताने “व्यसनमुक्ती” जाणीव-जागृती कार्यक्रमाचा घेतला लाभ

0
245

अनिकेत दुर्गे उपसंपादक चंद्रपूर – जनहिताय मंडळ व जय हेल्थ एॅज्युकेशनल अॅन्ड चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित झेप व झेप नई दिशा व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र, चंदपुर द्वारा शिव जयंती निमीत्याने दारुमुक्ती/व्यसनमुक्ती जाणीव-जागृती कार्यक्रम येरगाव, ता. मूल जि. चंद्रपूर येथे घेण्यात आला.
या कार्यक्रमात व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक श्री. प्रकाशजी पालीवाल यांनी समाजात वाढत जाणारी व्यसनाधिनता वर मात करण्यासाठी उपचाराची गरज या विषयी माहीती देवून येरगावकरांना मार्गदर्शन केले

झेप नई दिशाचे प्रकल्प समन्वय प्रफुल लोणारे यांनी आपल्या अनुभवातून मद्यपाश आजारअंतर्गत होणारी शारिरिक, मानसिक, आर्थिक व सामाजिक अस्तव्यस्तता समजवून सांगितले व या आजाराला नियंत्रणात ठेऊन सुखी आणि समाधानी जिवन जगण्याचे अनुभव दिले.
समुपदेशिका सपना दिंडे यांनी मद्यपाश आजाराअंतर्गत होणारी कौटुंबिक अस्तव्यस्तता व कुटुंबात व्यसनामुळे निर्माण होणारे वाद, कलह व दुष्परिणाम आपल्या अनुभवातुन सांगितले व यातुन निघुन आज आनंदी जिवन जगण्याची आशा गावकऱ्यांना दिली, येरगाव गावातील व्यसनाधिनतेतुन निघुन व्यसनमुक्त सात्विक जीवनाचा आनंद घेणाऱ्या नागरिकांचा श्रीफळ- दुप्पटा देऊन सत्कार करण्यात आला,
कार्यक्रमाचे संचालन आशिष जोशी यांनी केले या कार्यक्रमाचे प्रास्तविक सुभाष कोटकर व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रवि दिंडे यांनी केले या कार्यक्रमाचा लाभ येरगाव गावातील लोकांनी घेतला.
सुनिल नागापुरे, टिपलेश्वर चावरे, अशोक नागापुरे, सुनिल मसकर यांच्या अथक परिश्रमांतून आणि स्वाप्निल रत्नावार व प्रिती रत्नावार यांच्या पुढाकाराने कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.
झेप नई दिशा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here