भाषा आपली मराठी
महाराष्ट्राची मायबोली
झाली शब्दाने मधुर
स्पर्शून चिंब ओली…
ओंजळीत घ्यावे आता
शब्द सुमनाचे मोती
अशी गाऊया रसाळ
गोड अवीट महती…
भाव लेखणीला आले
भाषा समृद्ध होऊन प्रगत
व्यक्तिमत्व विकासाचा
वाढवूया आलेखात…
अध्ययन पठणात
भाषा वैभव दाखवू
मराठीचा स्वाभिमान
हृदयी निस्वार्थ बाळगू …
मराठीला जीवदान
दिले शिवाजी राजांनी
करू रक्षण आपण
अनमोल भाषा गौरव दिनी…
संगीता नागदिवे.

