prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – राष्ट्रीय विज्ञान दिन

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – राष्ट्रीय विज्ञान दिन

0
78

ज्ञान आणि विज्ञान
घालू यांचा मेळ
जाणून घेऊ सत्य
पाहू विज्ञानाचा खेळ।।१।।

गोल गोल पृथ्वी
सांगा कशी फिरते
गुरुत्वाकर्षनाच्या तालावर
मस्त मजेत डुलते।।२।।

विज्ञानाचे नियम सारे
आपण समजून घेऊ
अंधश्रद्धेला नेहमीच
आपणच फाटा देऊ।।३।।

पौर्णिमा आणि अमावस्या
आहे भौगोलिक घटना
आतातरी सर्वांनी मिळून
असे सत्य आपण मानू ना।।४।।

समिंदराची भरती ओहटी
अमावस्या पौर्णिमेला येते
ऐका दोस्तानांनो सर्वजण
हे फक्त विज्ञान सांगून जाते।।५।

विज्ञान आहे महान हेच
आज सांगू आपण जगाला
अनेक शास्त्रज्ञ लावतात शोध
खरोखर सलाम त्यांच्या कार्याला।६।।

प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here