माझ्या माय मराठीचा
गोडवा आहे हो केवढा
बोली अन् लेखणीतून
दिसे जणू पर्वताएवढा….
माय मराठीचा गोडवा
मराठी अस्मितेला मान
साहित्याच्या प्रांगणात
आमच्या मराठीची शान…
मराठी भाषेतील गंमत
जीवनात आनंद मिळवावा
ओळखू सारे मायबोलीला
तिचा अभिमान बाळगावा…
कायम राहो माय मराठी
गोडवा तिच्या भाषेचा
तीच असे प्रेम आपुलकी
अभिमान साऱ्या विश्वाचा.
प्रा.नानाजी रामटेके
आरमोरी जिल्हा गडचिरोली

