अनिकेत दुर्गे उपसंपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व महिला आघाडी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष मा. हारुन शेख, राष्ट्रीय महासचिव मा. योगेश दंदणे, संचालक तथा राष्ट्रीय संघटक योगेश पाटील आणि कोकण विभाग अध्यक्षा करूणा आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 2 मार्च 2025 रोजी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे ओळखपत्र वितरण व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. यावेळी संचालक तथा राष्ट्रीय संघटक योगेश पाटील, संचालक तथा राज्य समन्वयक मा. दयानंद निकम साहेब, कोकण विभाग अध्यक्षा मा.करूणा आहिरे आणि नाशिक जिल्हा प्रभारी शितल उपस्थित होत्या.
कार्यक्रमासाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या नगरसेविका मा. ज्योत्स्ना भोईर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. आपल्या भाषणात त्यांनी संघटनेचे कौतुक करत भविष्यातही संघटनेच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार तांगडकर साहेब यांनी महिलांची सक्षमता यावर महत्त्वपूर्ण विचार मांडले, तर मा. दयानंद निकम यांनी सत्याची ताकद यासंदर्भात विविध उदाहरणांद्वारे मार्गदर्शन केले. मा. योगेश पाटील यांनी संघटनेची उद्दीष्टे व कार्य याबाबत सविस्तर माहिती दिली आणि उपस्थित सदस्यांना सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहित केले.
कार्यक्रमास आंबिवली शहर उपाध्यक्ष प्राजक्ता गोसावी, उपाध्यक्ष ताई मढवी, संपर्क प्रमुख विनोद हाळदे, उपाध्यक्ष युवराज कदम, सदस्य विजय जाधव, अंबरनाथ तालुका उपाध्यक्ष चंद्रा भोईर, शहर अध्यक्ष मोहिनी भालेराव, सदस्य सविता गमरे, संपर्क प्रमुख आशा बडेकर आणि संघटक मुरलीधर भोईर यांनी नियोजनात सक्रिय सहभाग घेतला.
स्थानिक नागरिकांनी देखील या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली. संघटनेच्या भविष्यातील कार्याची दिशा ठरवण्यासाठी ही आढावा बैठक महत्त्वपूर्ण ठरली.

