prabodhini news logo
Home चंद्रपूर संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकाराचे व कर्तव्याचे पालन करणे, ही आपली जबाबदारी आहे....

संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकाराचे व कर्तव्याचे पालन करणे, ही आपली जबाबदारी आहे. – डॉ. दिलीप चौधरी

0
152

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – सर्वोदय शिक्षण मंडळ द्वारा संचालित सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली, चंद्रपूर येथे विद्यार्थी विकास विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली च्या संयुक्त विद्यमाने व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयात दिनांक 27 फेब्रुवारी ते 1 मार्च 2025 पर्यंत महाविद्यालयाच्या प्राचार्य व गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या सदस्य मा. डॉ.जयश्री कापसे मॅडम यांच्या नियंत्रणाखाली आणि विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. देवेंद्र बोरकुटे व सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. कल्पना कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले . या व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचा समारोपीय सोहळा दिनांक ०१ मार्च २०२५ रोजी शनिवारला आ.डॉ. जयश्री कापसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाकरिता प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.प्रा. डॉ. दिलीप चौधरी सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली तसेच महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता निर्धारण समितीचे सदस्य
” संविधानिक मूलभूत अधिकार आणि युवकांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करण्याकरिता उपस्थित होते. त्यांच्यासमवेत मंचावर ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ. ममता ठाकूरवार , डॉ. सुभाष गिरडे , डॉ. किरणकुमार मनुरे, विद्यार्थी विकास विभागाचे महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. डॉ. देवेंद्र बोरकुटे ,सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. कल्पना कवाडे उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि तीन दिवसीय कार्यशाळेचा अहवाल डॉ. देवेंद्र बोरकुटे यांनी सादर केला. तसेच पाहुण्यांचा परिचय डॉ सुभाष गिरडे यांनी करून दिला.
कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. दिलीप चौधरी यांनी आपल्या वक्तव्यातून सांगितलं की आपण आयुष्य जगत असताना संविधानिक नीतिमूल्ये, अधिकार आणि कर्तव्ये यांचे पालन करणे आपली जबाबदारी आहे. संघर्षातूनच यशस्वी जीवनाचा मार्ग सापडत असतो, फक्त तो मार्ग मिळेपर्यंत सातत्य आणि संयम राखता आला पाहिजे. मनोरंजनाच्या वेळी मनोरंजन पण अभ्यासाच्या बाबतीत कुठलीही काटकसर न ठेवता प्रत्येक विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्याचा संकल्प केला तर तो कुणीही थांबवू शकत नाही.”असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा व महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. जयश्री कापसे यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले, त्यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना संगीतले की, “मनुष्याच्या जडणघडणी मधे यासारख्या व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे खूप महत्त्व असते. ज्या मुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल होवून जीवनात यश आणि समाजात प्रतिष्ठेचे स्थान मिळविणे सोपे जाते.” अशी माहिती दिली. या समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. एस. डब्लू प्रथम वर्षाचा विद्यार्थी कुंदन खोब्रागडे यांनी तर आभार अभिषेक भोयर याने मानले. या व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेच्या यशस्वितेकरिता सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयीन प्रतिनिधी मोरेश्वर मडावी व वर्ग प्रतिनिधी आणि सर्व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here