
कामठी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – तालुक्यातील वडोदा येथे भारतीय लोक कलाकार सांस्कृतिक संघटना नागपूर द्वारा आयोजित, लोक कलावंताच्या मेळावा व जाहीर सत्कार दिनांक-02/03/2025 रोज रविवारला मोठ्या उत्साहात पार पडला, कार्यक्रमाचे उद्घाटक – भारतीय लोक कलाकार सांस्कृतिक संघटना नागपूर राष्ट्रीय अध्यक्ष – प्रकाश काळे गुरुजी, सचिव अनिल पारखी यांच्या हस्ते पार पडला, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी – महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहीर अंबादास नागदेवे, प्रबोधनकार चेतन बेले, प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे, शाहीर सुबोध काणेकर, शाहीर ज्ञानेश्वर पाटील, सुप्रसिद्ध गायिका पल्लवी नगरारे, सुप्रसिद्ध प्रबोधनकार तनुजा नागदे वे, गायिका नीलकमल गोंडाने, लावणी सम्राट सविता गाठकीने, गायिका उषा मेश्राम शाहीर आर्यन नागदेवे, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, याप्रसंगी मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथील अबोध भजन मंडळाच्या गायिका नीलकमल गोंडाने यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विज्ञानवादी विचार मांडून – शब्द भिमाचे कानी धरा, एकी करा, एकी करा, कारण तलवार एक धारी दुधारी तो भीम होता, एकटाच भिम माझ्या लाखात भारी होता, साऱ्या पुढार्यांना बाबाच्या धाक होता, कारण भीमराव माझ्या बापाचा बाप होता, अशाप्रकारे समाजप्रबोधन गीत सादर केले व त्यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला, याप्रसंगी गायिका पल्लवी नगरारे, गायिका तनुजा नागदेवे, गायिका नीलकमल गोंडाने, प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे, गायिका आम्रपाली बोरकर, इत्यादी शाहीर कलाकार गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.















