कामठी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – तालुक्यातील वडोदा येथे भारतीय लोक कलाकार सांस्कृतिक संघटना नागपूर द्वारा आयोजित, लोक कलावंताच्या मेळावा, स्थळ- विठ्ठल रुक्मिणी देवस्थान वडोदा तालुका कामठी जिल्हा नागपूर, दिनांक- 02/03/2025 रोज रविवारला सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत मोठ्या उत्साहात पार पडला, कार्यक्रमाचे उद्घाटक – भारतीय लोक कलाकार सांस्कृतिक संघटना अध्यक्ष प्रकाश काळे, सचिव अनिल पारखी यांच्या हस्ते पार पडले, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे – महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहीर अंबादास नागदेवे, शाहीर सुबोध कानेकर, कीर्तनकार चेतन बेले, प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे, शाहीर ज्ञानेश्वर पाटील, गायिका पल्लवी नगरारे, गायिका तनुजा नागदेवे, गायिका नीलकमल गोंडाने, शाहीर अशोक ऊ के, गायिका आम्रपाली बोरकर, गायिका उषा मेश्राम, शाहीर आर्यन नागदे वे, शाहीर श्रीकांत नागदे वे शाहीर अशोक डहाके, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, याप्रसंगी रामटेक तालुक्यातील किरण पूर येथील सुप्रसिद्ध गायक प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन घेत सादर केले, त्यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला, याप्रसंगी गायिका पल्लवी नगरारे, गायिका नीलकमल गोंडाने, गायिका तनुजा नागदेवे, भीम शाहीर प्रदीप कडबे, शाहीर ज्ञानेश्वर पाटील, शाहीर कलाकार गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

